अखेर कराडांनी मिडिया समोर येत प्रतिक्रीया दिली.

कराडांना

अखेर कराडांनी मिडिया समोर येत प्रतिक्रीया दिली.न्याय देवता जी शिक्षा देईल ती मान्य.

बीड:– मागील अनेक दिवसापासून बीड प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड यांनी आज एक व्हिडिओ जरी करत न्याय देवता देईल ती शिक्षा मान्य म्हणत शरणागती पत्करली. अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड यांना अटक कधी होणार यावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ चालू होता अटक करण्या अगोदरच वाल्मीक कराड यांनी स्वतः ला पोलिसांच्या स्वाधीन करत न्याय देवता जो निकाल देईल तो मान्य असे म्हणत शरणागती पत्करली.

 

करडांना

कराडांना अजुनही ३०२ चा आरोपी का करत नाहीत – आव्हाड.

याप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत ३०२ चा आरोपी म्हणून वाल्मीक कराड यांना अटक का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केला.

काय म्हणले जितेंद्र आव्हाड.

आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती.

अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या