पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष.
News published by News24tas
जालना:- शहरातील जुना जालना भागातील नागरिक कोणत्या न कोणत्या कारणाने त्रस्त असून नेहमीच त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून तेथील स्नानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचे तेथील नागरिकांना संवाद साधल्यावर निदर्शनास आले आहे. अनेक वर्षांपासून परिसरात मोकळ्या जागेवर काही लोक जाणीवपूर्वक घाण कचरा व मांस आणून टाकतात व नंतर तेथेच त्या कचऱ्याला आग लावतात त्यामुळे येथे अनेक वेळा भीषण आग लागून परिसरात धूर पसरतो व नागरिकांना श्वसनाचे आजार यामुळे होऊ लागले तसेच जवळच मोठ्या प्रमाणात मांस विक्री करणारे व्यापारी असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बायो वेस्ट देखील टाकले जाते व त्यामुळे या परिसरात नेहमीच मोकाट कुत्र्यांचा वावर असतो व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनवर अनेक वेळा मोकाट कुत्रे हे हल्ला करतात त्यामुळे सदरील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यावर वारंवार स्वच्छता निरीक्षकांना व पालिकेला निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घरे सोडून जाऊ म्हणत अनेक नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.
परिसरातील नागरिकांशी संवाद साधल्यावर अनेक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिला मिळाल्या असून अनेकांनी महानगर पालिका प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर आम्ही सगळे नागरिक घरे सोडून जाऊ असा इशाराच थेट पालिकेला दिला आहे .तर काही म्हणले आहे की वेळेवर टॅक्स भरून देखील आम्हाला जर अशा त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर आम्ही पालिका प्रशासनाच्या विरोधाद मोठे आंदोलन उभारू व जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेऊ असा इशारा येथील नागरिकांनी दिला.
