कुणाल कामरावर अटकेची कारवाई करावी – खोतकर.
News published by News24tas
मुंबई:-कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या लेटेस्ट पॅरोडीमुळे तो वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम शूट झाला होता तो त्यांनी उद्ध्वस्त केला. त्याचबरोबर आता हा मुद्दा विधानसभेत देखील गाजत असून शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कुणाल कामरावर अटकेची कारवाई करण्यात यावी असे म्हणले आहे.
कामरा चे बोलविते धनी कोण शोधले पाहिजे – खोतकर.
आमदार अर्जुन खोतकर यांनी कामरावर कारवाई ची मागणी करते वेळी हा कामरा हिंदू देव देवतांचा अपमान करतो याच्या मनात धार्मिक द्वेष असून याच्या असल्या विधानामुळे राज्यात दंगली होऊ शकतात. कामराच्या मुसक्या वेळीच आवरल्या नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा कामरा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेपार्ह टिपणे. कॉमेडीच्या नावावर इतर पक्षाच्या सुपाऱ्या हा घेतो याचा बोलावता दानी कोण हा शोधला पाहिजे असे अर्जुन खोतकर म्हणाले. खोतकऱ्यांच्या या भाषणानंतर लगेच सभागृहात गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचे कामकाज ५ मिनिटे बंद करण्यात येत आहे असे सभागृहाचे अध्यक्ष यांनी सांगितले.
शिवरायांच्या वाघ्या कुत्र्याची समाधि काढून टाका -संभाजी राजे.
