अर्जुन खोतकर यांच्या पाठपुवठ्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.

आमदार अर्जुन खोतकर यांचे पाठबळ व सामाजिक पाठपुराव्यामुळे जालना शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.

News published by news24tas

जालना:- अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा जालना शहरातील मंमादेवी चौकात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात उभारला गेला. जालना शहरातील सकल राजपूत समाजाच्या पाठपुराव्यामुळे व आमदार अर्जुन खोतकर यांचे पाठबळामुळे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला असल्याचे राजपूत समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष खुशालसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना ठाकूर नेमके काय म्हणाले?

याबाबत पत्रकारांशी बोलतांना ठाकूर म्हणाले की, जालना शहरात हिंदूसूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला पाहिजे, अशी सकल राजपूत समाजाची मागणी होती, त्यानुसार जालना शहरातील मस्तगड भागात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा ठराव सन 2005 मध्ये भास्कर अंबेकर हे नगराध्यक्ष व आपण उपनगराध्यक्ष असतांना नगर पालिकेत एकमताने संमत झाला होता. हा पुतळा उभारला जावा, यासाठी सकल राजपूत समाजाने महाराणा प्रताप स्मारक समिती स्थापन केली होती. या स्मारक समितीने सातत्याने पुतळा उभारण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सन 2017-18 मध्ये तत्कालीन आमदार कैलास गोरंट्याल तसेच नगराध्यक्षा संगिताताई गोरंट्याल यांनी पुढाकार घेत मस्तगड येथे नियोजित महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या जागेवर फाऊंडेशनचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर राजपूत समाज व महाराणा प्रताप स्मारक समितीच्या वतीने सातत्याने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची व त्याचे अनावरण करण्यासाठी प्रयत्न केले. पुतळा उभारणे व त्याच्या अनावरणासाठी काही बाबी आडव्या येत होत्या, त्यात गृहखात्याचे नाहरकत प्रमाणपत्र अडचणीची ठरत होती.याशिवाय काही बाबीही होत्या. आमदार अर्जूनराव खोतकर यांनी पुतळा उभारणी व अनावरणासाठी येणाऱ्या सर्व बाबींचा पाठपुरावा केल्याने दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महाराणा

प्रताप यांच्या राज्यभिषेक दिनी आमदार अर्जूनराव खोतकर यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण पार पडले आहे. जालना शहरात महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकामी प्रयत्न तसेच पाठपुरावा करणाऱ्या सर्व नेते मंडळीचे सकल राजपूत समाजाने आभार मानले असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराणा प्रताप स्मारक समितीचे अध्यक्ष लखनसिंह ठाकूर, सचिव सनी बुंदेले, सदस्य शक्तीसिंह राजपूत, देवेंद्र बुंदेले, मनोज देवरे विकी काबरे आकाश ताजी राजू राजपूत शिवम राजपूत लक्ष्मण वर्मा बालाजी राजपूत बजरंग राजपूत संतोष माधवले बाला परदेसी शेखर परदेशी पंकजा अंधारे मनोज पिछाडे आदींची उपस्थिती होती.

जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.

https://news24tas.com/मेलेला-मराठा-विरुद्ध-म/

https://news24tas.com/जालना-मनसेतर्फे-शहरात-अन/

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या