जालना शहरात राबण्यात आली ‘महा स्वच्छता मोहीम’
News published by news24tas
जालना:- जालना शहरात लोकसंख्येबरोबर वाढत चाललेली अस्वच्छता, दुर्गंधी व कचरा एकट्या महानगर पालिकेमुळे स्वच्छ होणे शक्य नाही ही अस्वच्छता स्वच्छ कराची असेल तर यासाठी लोकांमध्ये जनजागृती व लोकसहभागातून कार्य करून अनेक मोहिमेतून व उपक्रमातून या अस्वच्छतेवर आपल्याला विजय मिळवता येईल याच हेतुने शहर महानगरपालिका,पोलीस प्रशिक्षण केंद्र, कुंडलिका-सीना फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १६.०२.२०२५ रोजी जालना शहर “महास्वच्छता अभियान” राबविण्यात आले.
आज पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षणार्थी, जालना शहर महानगर पालिका अधिकारी – कर्मचारी, स्वच्छता विभाग मनपा, सामाजिक संस्था, जबाबदार शहरवासीयांनी मोठ्या संख्येत सोबत येत अवघ्या तासाभरात शहरातील अनेक ठिकाणी स्वच्छता करत शहर सुंदर केले.
जालना शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी करण्यात आली स्वच्छता.
• अग्रसेन चौक, भोकरदन नाका
• राजुरी काॅनर्र
• लक्कडकोट टी पाॅईंट
• स्वा.सै रामभाऊ राऊत चौक
• ओ पी अग्रवाल चौक
• स्वा. सै जनार्दन मामा चौक
• स्वातंत्र्यवीर सावरकर चौक
• फुल बाजार चौक
• टांगा स्टॅन्ड चौक
• दवा बाजार रस्ता
• महावीर चौक
• अलंकार थिएटर रस्ता
• फुलंब्रीकर नाट्यगृह रस्ता
• सरोजिनी देवी रस्ता
• नेताजी सुभाषचंद्र चौक
• विवेकानंद हॉस्पिटल दे. राजा रस्ता
• भाला हाॅस्पिटल रोड
• बडी सडक
• पोस्ट ऑफिस रस्ता
• आझाद मैदान रस्ता
• काद्राबाद रस्ता ….. आणि
*छत्रपती शिवाजी महाराज पुतळा*
येथे महास्वच्छता अभियान राबवत संपूर्ण परिसर नागरिकांकडून स्वच्छ केला गेला.
सदर अभियानामध्ये शहरातील रस्त्यावरील दोन्ही बाजूने झाडाने, रस्त्याचे बाजूचे मातीचे ढिगारे उचलणे, रस्त्याच्या मधोमध असलेला दुभाजकातील कचरा काढणे, कचऱ्याचे अड्डे कचरा मुक्त करणे व इतर बाबींविषयी स्वच्छता करण्यात आली.त्यामुळे आता असेच उपक्रम जर शहरात राबवले गेले तर नक्कीच शहरात स्वच्छता नांदेल हे निश्चित.
