आता बघू भाजपचे चोंगे सावरकरांना विरोध करतात का?

आता तुम्ही सावरकरांचा विरोध करणार का? म्हणत राज ठाकरेंच्या त्या विधानावरून भाजपला मनसेनेच केला सवाल.

News published by News24tas

मुंबई:-राज ठाकरे सत्तेत असो की नसो, त्यांचे आमदार असोत किंवा नसो त्यांनी केलेल्या विधानाला महाराष्ट्रात नव्हे देशातच एक वेगळेच महत्व नेहमीच असते. अनेकवेळा त्यांच्या विधानामुळे मोठा वाद देखील निर्माण होत असतो.असाच काहीसा वाद राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या भाषणात केलेल्या विधानामुळे झाला असून अनेक जण या विधानाचे समर्थन करत आहे तर अनेक जण विरोध.त्यातच जे लोक राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध करत आहे व त्या विधानामुळे राज ठाकरेंवर टीका करत आहेत त्याच विधानाला आता मनसे कडून स्वतंत्रवीर सावरकर यांचा संदर्भ देत राज ठाकरे बोलले ते योग्यच असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणले आहे.

काय म्हणाले जाधव व सावरकरांचा तो संदर्भ नेमका कोणता?

राज ठाकरे हे सनातन धर्मा विरोधात आहे या टीकेला अविनाश जाधव यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी सावरकरांच्या सहा आणि सत्तावन या पुस्तकातील दाखले देत म्हणले की,राज ठाकरे जे २०२५ मध्ये बोलले ते सावरकर १९५० मध्ये बोलले आहेत त्यामुळे भाजपचे चोंगे आता सावरकरांचा विरोध करतात का बघू असे जाधव यांनी पोस्ट करत म्हणले आहे. त्या पुस्तकात सावरकर स्वतः लिहितातः “अशा या कुंभमेळ्यांत लाखोंच्या संख्येने हिंदू एकत्र जमून स्नानादी करीत असत. त्यामुळे रोगराई पसरण्याचा संभव वाढे आणि शत्रूना हल्ला करण्याची संधी मिळे.” त्यामुळे आता राज ठाकरे बोलले ते योग्यच हे योग्य पद्धतीने मनसे नेत्यांनी जनतेला पटवून दिले हे निश्चित.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या