आयुक्तांच्या खात्यात अनेक नागरिकांनी पाठवले पैसे!

जालन्यात आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे वर अनेकांचे पेमेंट.

News published by News24tas

जालना:– जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे नंबरवर आज दुपार पासून अनेक जण पैसे पाठवत असून अनेकांचे फोन पे चे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व त्याचबरोबर आयुक्त संतोष खांडेकर यांचा मोबाईल नंबर देखील व्हायरल होत असून या क्रमांकावर पैसे पाठवून कुत्र्यांचे नियोजन करण्यासाठी आयुक्तांना व महानगर पालिकेला मदत करा असे आव्हान देखील एका मेसेज द्वारे अनेक नेटकरी जालना शहरात करत आहेत. अनेक महिन्यांपासून निवेदन देऊन देखील पालिका प्रशासन कुत्र्यांचे नियोजन करत नसून याच कारणामुळे आज गांधीनगर येथील एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून याला पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे असे अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त होत म्हणत आहेत. त्यामुळेच कुत्र्यांचे नियोजन लवकरात लवकर व्हावे यासाठी आयुक्तांच्या खात्यावर जालन्यातील नागरिकांना प्रत्येकी १ रुपया पाठवण्याचे आव्हान अनेक जण करताना दिसत आहेत.

लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा पालिकेत कुत्रे सोडू! – मनसे.

जालना शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उघड्यावर होणारी मांस विक्री व त्यातून निघणारे टाकाऊ घटक यांमुळे कुत्र्यांची वाढणारी संख्या यावर पालिकेचा सर्रासपणे दुर्लक्ष असून पालिका प्रशासनाने लवकरात लवकर कुत्र्यांचे नियोजन करावे व उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांना देखील ताकीत दिली पाहिजे असे मनसेचे जिल्हा अध्यक्ष रवि राऊत यांनी म्हणले असून यावर जर पालिकेने लक्ष देऊन सदरील प्रश्न मार्गी लावले नाही तर जेवढे मोकाट कुत्रे आहेत ते सर्व पालिकेत आणून सोडू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

पावसाळा चालू होण्या आधीच अनेक ठिकाणी तळे! पावसाळ्यात जालन्याचे काय होणार!

जालन्यात भटक्या कुत्र्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू.

सायरन भारतात वाजले आणि हल्ला पाकिस्तानात झाला.

वैभवीने करून दाखवले बारावीच्या परीक्षेत मिळाले घवघवीत यश.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या