मनसे पक्ष पुन्हा एकदा पराभव पचवून मैदानात उतरतांना दिसत आहे.त्यामुळे आता इंजिन यार्डात नाही तर मैदानात दिसत आहे.
News published by news24tas
मुंबई:- विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवून राज ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरताना दिसत आहेत. आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीत झालेला पराभव विसरून पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले असून अनेक विभागांच्या बैठका शिवतीर्थावर चालू झाल्या आहेत.
आगामी निवडणुकीत इंजिनची कोणासोबत युती करायची.
राज्याच्या राजकारणात एकटा चलो रे चा नारा देणारा मनसे पक्ष आता पालिका निवडणुकी साठी कोणासोबत युती करायची यावर देखील चर्चा करत आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र येतील का?
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की ठाकरे एकत्र येतील या चर्चा पक्षापेक्षा प्रसामाध्यमांवर जास्त दिसून येतात मुळात कोणासोबत युती आघाडीत करायची याचा सर्वस्वी निर्णय राज ठाकरेच घेतीलअसे देशपांडे म्हणले.
