विरोधकांच्या हातात काही राहिले नाही म्हणून ते आरोप करतात- खोतकर.
News published by News24tas
जालना:- छावा चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाल्या पासून औरंगजेबाविरुद्ध देशासह संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट पसरलेली आहे. ज्या प्रमाणे औरंगजेबाने संभाजी महाराजांना यातना दिल्या त्या पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या व क्रूरकर्मा औरंगजेब याचे निशाण या महाराष्ट्रात नको म्हणत औरंगजेबाची कबर येथून काढून टाका अशी एक जण भावनेची लाट संपून महाराष्ट्रात पसरली आहे. त्यातच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने सरकाने ही कबर तत्काळ हटवावी अन्यथा बाबरी प्रमाणे आम्ही येथे कारसेवा करत ही कबर हटवू असा इशारा दिल्यावर वातावरण आणखीनच तापले आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे
औरंगजेबाच्या कबरीवर काय म्हणाले आ. अर्जुन खोतकर?
पत्रकारांशी संवाद साधत असताना अर्जुन खोतकर म्हणाले की, निश्चितपणे क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर ही आमच्या भागात नकोच.जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अजित दादा यांना निर्णय घ्यावा लागेल.यावेळी पत्रकारांनी खोतकर यांना विचारले की औरंगेबाच्या कबरीच्या आडून महागाई,बेरोजगारी व इतर सर्व विषयापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातोय का ?प्रश्नाला उत्तर देताना खोतकर म्हणाले की, विरोधकांच्या हातात आता काही उरले नाही त्यामुळे ते असले आरोप करत आहेत असे खोतकर म्हणाले.
