लाच स्वीकारताना कंत्राटी अभियंता रंगे हात पकडला गेला.
News published by News24tas
जालना:- शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटी अधिकाऱ्यांमुळे व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढतोय का? असा प्रश्न आता अनेकांना पडू लागलाय लाच स्वीकारण्याची नवनवीन प्रकरणे रोज समोर येत असून यात एक मुख्य साम्य आढळते ते म्हणजे लाच घेणारा व घोटाळे करणारा हा शक्यतो कंत्राटी अधिकारीच असतो. मग उदाहरणच द्यायचे झाले तर संभाजीनगर मधील २० कोटीहुन अधिक चा घोटाळा करणारा कर्मचारी असो की काल जालन्यातील भोकरदन येथे ५ हजारांची लाच घेणारा कंत्राटी अभियंता या सारख्या अनेक उदाहरणांमध्ये कंत्राटी अधिकारीच का आढळतात? यांना प्रशासनाचा धाक नसतो का? की पदावर भरती पासून उच्च अधिकाऱ्याच्या मर्जीतले व ओळखितले असतात म्हणून यांना बड्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त आहे का असेच प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत.
पाच हजारांची लाच स्वीकारताना कंत्राटी अभियंता रंगेहात पकडला गेला.
घरकुलचा दुसरा हप्ता देण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना भोकरदन पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला प्रदीप रघुनाथ राठोड वय (३२) वर्षे यास लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले असून ही कारवाई पंचायत समितीच्या पार्किंग परिसरात करण्यात आली. पंचायत समितीमध्ये मोठी आर्थिक लुबाडणूक होती होती.त्यामुळे लाभार्थी वैतागले होते .व कनिष्ठ अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने ते सिद्ध देखील झाले. लाभार्थ्याने वारंवार विनंती करून देखील राठोड यांनी योजनेचा दुसरा हप्ता वर्ग करण्यास नकार दिला व म्हणाले होते की, दुसरा हप्ता पाहिजे असेल तर २० हजार द्यावे लागतील. त्यानंतर ५ हजारांची तडजोड झाली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्याने लाच लुचपत विभागाकडे धाव घेतली. लाच लुचपत विभागाने पडताळणी करून सापळा लावला व आरोपीला लाच स्वीकारताना पकडले.सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिकारी बाळू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, कर्मचारी श्रीनिवास गुडूर, अमोल चेके, शिवा खुळे यांनी केली आहे.
