कराड अटकेत पण ते प्रश्न अजूनही अनुत्तरीत.
News published by News24tas
बीड:-काल अचानकपणे एक व्हिडिओ प्रकाशित करत वाल्मीक कराड यांनी आत्मसमर्पण केले. २२ दिवसापासून चालू असलेला पोलिसांच्या शोध मोहिमेला वाल्मीक कराड यांनीच ब्रेक लावला व न्याय देवता जो न्याय देईल तो मान्य म्हणत शरणागती पत्करली.वाल्मीक कराड यांना अटक जरी झाली असली तरी काही प्रश्न अजून देखील अनुत्तरीतच आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याबाबतीत पुढील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत…(कराड)
1)संतोष देशमुख यांची हत्या एवढ्या क्रूरपणे का करण्यात आली..??
2)हत्या करणाऱ्या आरोपीची संख्या नक्की किती..??
3) हत्या करणाऱ्या आरोपीचा मास्टरमाईंड नक्की कोण..??
4) वाल्मिक कराड खरंच निर्दोष होता तर 20 दिवस फरार का…??
5) वाल्मिक कराड 15-20 दिवस महाराष्ट्रातील विविध भागात संचार करत होता तरी पोलीस यंत्रणेस कसा सापडत नव्हता..??
6) वाल्मिक कराडला नक्की कोण पाठीशी घालत आहे..??
7) वाल्मिक कराडला शरण येण्यास नक्की कोणी सांगतिले..??
8) वाल्मिक कराड पुणे सीआयडी ऑफिसलाच का शरण आला..??
9) वाल्मिक कराड फरार होता तर त्याच्या समर्थनात परळीवर एवढा लोंढा कसा आला..??
10) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडीओ नक्की कोणत्या तीन व्यक्ती पाठवला…??
11) हत्यारे आरोपी व्हिडीओ कॉल द्वारे हत्याचे प्रदर्शन नक्की कोणास दाखवत होते..??
12)हत्या दरम्यान एका बड्या नेत्याच्या संपर्कात आरोपी सतत होते तो बडा नेता नक्की कोण होता..??
13) वाल्मिक कराडला वाचवणारा नक्की आका कोण..??
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात मिळतील का अशी चर्चा आता न्युज माध्यमे व सोशल मीडियावर चालू आहे.
वाचा सविस्तर:-
राज ठाकरे यांचे नवीन वर्षी कार्यकर्त्यांना आदेश.
वाह क्या सीन हैं ! करडांच्या फोटो व्हायरल.
