कल्याण नंतर पुन्हा मराठी महिलेला मारहाण.

कल्याण नंतर ठाण्यात मराठी महिलेला सुरक्षा रक्षकाने केली बेदम मारहाण

 

ठाणे :-कल्याण येथील मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असताना आता ठाण्यातून एक घटना समोर येत आहे. ठाण्यातील विविआना मॉल येथे एका मराठी महिलेला परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने बेदम मारहाण केल्याचे समजत आहे .

विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे. मनसेकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते येथे पोहचले आहेत.

मराठी महिलेला

भाडे नाकारल्याच्या वादातून मराठी महिलेला मारहाण.

समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील विविआना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने महिला रिक्षा चालकाला मारहाण केली आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्याच्या वादतून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकानं या महिला रिक्षाचालकाकडे भाड्या बाबत विचारणा केली, मात्र या महिलेनं त्यांना आपल्या रिक्षातील गॅस संपला आहे, असं सांगितलं. त्यानंतर यावरून महिला रिक्षा चालक आणि या मॉलचा सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने अरेरावीची भाषा केल्यामुळे महिला रिक्षा चालक त्याच्या अंगावर धावून गेली, त्यानंतर या सुरक्षा रक्षकाने महिलेला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे नेते अविनाश जाधव घटनास्थळी दाखल.

मराठी महिलेला

दरम्यान या घटनेची दखल आता मनसेकडून घेण्यात आली आहे. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव आणि कार्यकर्ते विवियाना मॉलमध्ये पोहोचले आहेत.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या