Jalna:- कोटींची करवसुली पण ट्रॅफिक नियोजन नाही ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस कठीण होत आहे – मनसे
News published by news24tas
जालना:- जालना शहरातील ट्राफिक च्या नियोजनाचे तीनतेरा वाजलेत अनेक ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते व यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होताना दिसत आहे.
जालना शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व त्यामुळे शहारातील मुख्य चौकात व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना रोजच दिसत आहे. ट्राफिक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने अनेक वेळ ही ट्रॅफिक कोंडी अशीच राहते .अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी खाजगी बस देखील मुख्य रस्त्यात विशेषतः बस स्टँड भागात उभ्या केल्या जातात व त्यामुळे देखील वाहतूकोंडी होत असते यावर ट्रॅफिक पोलीस का लक्ष देत नाहीत असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
कोटींची करवसुली पण सुविधा नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक.
सदरील विषयावर मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे यांनी देखील संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रीया दिली यावर बोलताना ते म्हणाले की, ट्रॅफिक पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते सोडून फक्त रिंग रोड धरलेत व तेथे मोठ्या प्रमाणात कर वसुली चालू आहे तुम्ही कर वसुली करा आमचं त्याला विरोध नाही परंतु पण शहरातील जी वाहतूक आहे तिचा पूर्ण पणे बट्ट्याबोळ झाला आहे. पाणीवेस,मंमादेवी मंदिर परिसर, सी.टी.एम.के. शाळा तसेच शहरातील अनेक मुख्य ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे त्याकडे देखील लक्ष द्यावे व तुम्हाला जर नियोजन करता येत नसेल तर पोलिस निरीक्षक शेवाळे साहेब तुम्ही तुमची बदली जालना शहरातून करून घ्यावी जालन्यातील नागरिकांना तुम्ही वेठीस धरू नका असे देखील मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे म्हणले.
जालन्यात गतवर्षी तब्बल ४ कोटी ५८ लाखांचा दंड.
जालना शहरातील सुमारे ४९ हजार वाहनधारकांनवर कारवाई करत तब्बल ४ कोटी ५८ लाखांचा दंड गतवर्षी आकारण्यात आला. वाहन चालविताना नियम पाळणाऱ्यांची संख्या शहरात कमीच आहे. नियम मोडून वाहन चालविणाऱ्या चालकांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. चालू वर्षातील ११ महिन्यांत तब्बल ४९ हजार ६८२ चालकांवर कारवाई केली आहे. त्यात संबंधितांना तब्बल ४ कोटी ५८ लाख १६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक कारवाया शहर वाहतूक शाखेने केल्या. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १२ हजार १४२ वाहनचालकांवर कारवाई केली व संबंधितांना तब्बल एक कोटी २९ लाख ४० हजार ३५० रुपयांचा दंड केला आहे.
दुचाकीवर ट्रिपलशीट बसणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, विनानंबर, फॅन्सी नंबर, विनापरवाना वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई दरम्यान, वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे, याबाबतही वाहतूक शाखेकडून वेळोवेळी जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
For more updates follow like and share.
