छावा चित्रपट बघून महाराजांचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर पसरला.
News published by News24tas
महाराष्ट्र:-सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त छावा चित्रपटाची संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट संपूर्ण भारतभर नवनवीन रेकॉर्ड स्वतःच्या नावे रचत असून महाराजांच्या पराक्रमाची आठवण पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर होताना दिसत आहे.चित्रपटातील महाराजांचा पराक्रम जेवढा प्रेक्षकांना आवडला त्याहून जास्त राग व चीड आली ती औरंगजेबाची ज्या प्रकारे औरंगजेबाने संभाजी महाराजांना यातना दिल्या ज्या प्रकारे अत्याचार केले ते बघून अनेकांना रडू आले तर काहींना राग इतका अनावर झाला की चक्क चित्रपट गृहाची स्क्रीन त्यांनी फाडली. आणि आता हाच चित्रपट बघुन दिल्लीतल्या काही तरुणांनी असे काही केली आहे की त्यामुळे त्यांचे सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.
छावा चित्रपट बघून नेमके तरुणांनी केले तरी काय?
दिल्लीतल्या काही तरुणांनी छावा चित्रपट बघून महाराजांवर औरंगजेबाने जे अत्याचाराचे केले ते बघून दिल्लीतल्या मुख्य चौकातील अनेक ठिकाणी मुघलांच्या नावे असलेल्या चौकातील फलकांवर काळे फासत त्या चौकांचे नामांतर केले व ज्या मुघलांनी हिंदुवर अशाप्रकार अत्याचार केले त्यांचे नावे कायमचे पुसले पाहिजे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत म्हणले आहे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक जण यांचे कौतुक देखील करत आहेत. परंतु जर छावा चित्रपट बघून जर दिल्लीतले तरुण जागी होत असतील तर महाराष्ट्रातले मावळे का नाही असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला व महाराष्ट्रात आज देखील ज्या औरंगजेबाने एवढे अत्याचार केले त्याच्या नावे जिल्ह्याच नाव अजूनदेखील का पुसले जात नाही असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
खालील लिंक वर क्लिक करून बघा दिल्लीतल्या त्या तरुणांचा संपूर्ण व्हिडिओ .
https://www.facebook.com/share/v/1BT36vrnKD/
