जत येथे API ने छत्रपतींचे बॅनर फाडले मोठा वाद निर्माण.

जत:-त्या ए.पी.आय. ला सुतासारख सरळ केले जाईल -आमदार गोपीचंद पडळकर .

News published by news24tas

सांगली:- सांगलीतील जत या तालुक्यात मोठा वाद निर्माण झाल्याचे पहिला मिळाले. एका API ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध करतानाचा बॅनर फाडला. आता त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया वर व्हायरल झाल्या नंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी या गोष्टीचा निषेध नोंदवत API यांना थेट इशाराच दिला.

काय म्हणाले गोपीचंद पाडळकर

जतमध्ये घडलेल्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. शिवरायांचे पोस्टर फाडणारा एपीआय सुतासारखा सरळ केला जाईल. मी तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की आपण संयम राखावा. महायुती हे हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे. हिंदुविरोधी कारस्थानं खपवून घेतली जाणार नाहीत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा कुणीही असो, त्याला गुडघ्यावर बसवून, नाक घासून उभ्या महाराष्ट्राची माफी मागावी लागेल.

जय भवानी जय शिवराय

– आमदार गोपीचंद पडळकर 

Video

https://youtu.be/sDuCIcl7E7E

यामागे कोणती राजकीय शक्ती असल्याचा पाडळकारांणा संशय .

याविषयावर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणले की समस्त महाराष्ट्रातील धारकरी व वारकरी यांच्या ह्रुदयात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे.त्यांना तुम्ही हृदयातून हटवणार आहात का. मी तमाम शिवप्रेमींनी आव्हान करतो की त्यांनी शांतता बाळगावी. आपले सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतलं जाणार नाही ज्या ए.पी.आय. ने हे कृत्य केले त्याच्यावर निच्छितपणे कारवाई होईल. मी ही गोष्ट मुख्यमंत्री व एसपी यांच्या कानवरती घातली आहे. पण ज्या ए.पी.आय ने हे कृत्य केले त्याच्या मागे कोणत्या राजकीय शक्तीचे हात आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे.कारण २००९ ल देखील असाच काहीसा प्रकार झाला होता असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या