माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत -जरांगे.

जरांगे

सरकारने माझ्या पाहुण्यांचे नाव मुद्दाम तडीपारीची यादीत टाकले असावे – जरांगे पाटील.

News published by News24tas

जालना:- जरांगे पाटील यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई झाल्यानंतर पाटील यांनी पुढे येत यावर ते बोलले असून सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवलं असावं. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. त्यांना माहीत नाही की, मी समाजापुढे आई- बापाला सुद्धा जवळ केलं नाही. मग पाहुणेरावळ्यांचा तर प्रश्नच येत नाही असे जरांगे पाटील म्हणाले असून आता पुन्हा या प्रकरणामुळे फडणवीस विरूद्ध जरांगे असा नवीन वाद राज्यात सुरु होतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जरांगेंच्या मेहुण्यावर अवैध वाळू वाहतूकीमुळे तडीपारीची कारवाई.

हुण्यां

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहूण्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने सदरील तडीपारीची कारवाई करण्यात आली असून अन्य ८ जणांचा यात समावेश आहे.

या आरोपींपैकी सहा आरोपी हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याची माहिती समोर येत असून,या आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, आंतरवाली सराटी येथे आंदोलनात जाळपोळ व सरकारी कामात अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल आहेत.

जरांगे पाटलाच्या मेहुण्या विरोधात कोणते गुन्हे दाखल?

जालना पोलीसांनी ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली त्यात मनोज पाटील यांच्या मेहुण्याच्या समावेश असून त्याच्याविरोधात २०२१ आणि २०२३ मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आसून २०२ ३ मध्ये जालना येथील शाहगड येथे बस जाळल्याप्रकरणी देखील एक गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केशव वायभट, संयोग सोळुंके, गजानन सोळुंके, संदीप लोहकरे, रामदास तौर, अमोल पंडित, गोरख कुरणकर, वामन तौर आणि विलास खेडकर अशी या नऊ जणांची नावे आहेत. या नऊ जणांवर वाळू चोरीसह इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी विलास खेडकर हा मनोज यांचा मेहुणा आहे.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या