जालना महानगर पालिकेला वार्षिक ४० ते ५० कोटीचा फायदा होणार – आमदार अर्जुन खोतकर.
news published by news24tas
जालना:- दोन वर्षापूर्वी जालना शहर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले परंतु महानगर पालिकेच्या माध्यमातून ज्या वेगाने शहराचा विकास झाला पाहिजे होता तो अध्याप पर्यंत झालेला नाही. त्याचमुळे आता विकासाला वेग देण्यासाठी जालना विधानसभेचे नवनियुक्त आमदार अर्जुन खोतकर हे पुढे आले असून त्यांच्या प्रयत्नामुळे जालना महानगर पालिकेची तब्बल ४० ते ५० कोटी रुपये वार्षिक बचत होणार असून या बचतीमुळे जालन्याच्या विकासाल गती मिळणार असल्याचे समजते.
अर्जुन खोतकरांनी सांगितले अश्या प्रकारे पालिकेच्या ४० ते ५० कोटी रुपयाची बचत होणार.
जालना शहराला जायकवाडी मधून १८ दशलक्ष व घाणेवाडीतून ५ दशलक्ष असे एकूण २३ दशलक्ष पाणी ६ ते ८ दिवसाआड मिळते. महानगर पालिका जे पाणी उचलते त्यासाठी महिन्याला महानगर पालिकेला १ कोटी विजबिल भरावे लागते आणि भविष्यात जालनेकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ५० दशलक्ष पाणी उपसा करावा लागेल. त्यासाठी सुमारे २ ते ३ कोटीचे विजबिल महानगरपालिकेला येईल त्याचबरोबर शहरातील विद्युत पोल व इतर विद्युत खर्च मिळून महानगर पालिकेला महिन्याला सुमारे ४ ते ५ कोटी रुपये हे वीज बिलासाठी लागणार आहेत म्हणजेच वार्षिक ४० ते ५० कोटी रुपये सरासरी महानगर पालिकेला वीज बिलावरती खर्च करावे लागतील. ही बाब जेव्हा मला काळाली तेव्हा मी त्या विषयाच्या खोलात गेलो व विचार केला की जर पालिकेने ५० कोटी जर फक्त वीज बिलवरती खर्च केले तर शहराच्या विकास करायचा कसा असा प्रश्न जेव्हा मला पडला तेव्हा या विजबिला पासून मुक्ती मिळावी यासाठी घानेवाडी येथील ७० एक्कर जागेचा सर्वे आम्ही केला व जागा निश्चित केली व त्या जागी १५ मेगा व्हॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प व्हावा ही गोष्ट मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कानवरती टाकली व त्यांनी देखील सकारात्मकता दर्शवली व येत्या एप्रिल च्या शेवट पर्यन्त सदरील ९५ कोटी रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण होईल व महानगर पालिकेचे वार्षिक विजबिलाचे ४० ते ५० कोटी रुपये वाचतील असे पत्रकारांशी बोलतांना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात एवढी मोठी बचत झाल्यामुळे महानगर पालिकेला सोन्याचे दिवस या प्रकल्पामुळे येतील असे सर्वत्र बोलले जात आहे.
