शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर दिव्यांगाचे उपोषण स्थगित.
news published by news24tas
जालना :-जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ५ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते.यामध्ये दिव्यांग यांना 50 टक्के पाणीपट्टी आणि घर पट्टी माफ करण्यात यावे दिव्यांग यांना पुनर्वसन केंद्र सुरू करा दिव्यांग यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अशा विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु त्यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
आठ दिवसात सदरील विषयावर तोडगा काढण्याचे अतिरिक्त आयुक्त (जालना मनपा ) यांचे आश्वासन.
आठ दिवसात महापालिकेत बैठक लावणार असल्याचा आश्वासन जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिले. या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर,भाजपाकडून माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण,शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले,शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.त्यावेळी सदरील विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन अति. आयुक्त यांनी दिले व त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
सदरील आंदोलना वेळी शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदूले,राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे सतीश फतपुरे, दिव्यांग आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे,अनिल महापुरे ,सुरेश बोरुडे ,जगदीश सातपुते,शेख जावेद,शेख इस्माईल शेख,रशीद दसरत,तोंडवे राजेंद्र कुलकर्णी,रवी तायडे,विलास कांबळे,उद्धव भुजबळ,नागेश अंबिलवादे,सुनंदा भास्करे,रंगनाथ शिंदे,रेहान शेख, प्रकाश एडके,भीमराव साळवे,तुळशीराम घडे,साबेर शेख,इम्रान भाई,आदिचा उपोषणा स्थळी सहभाग होता आदींची उपस्थिती होती.

जालन्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण,हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुरवंशी,राष्ट्रवादीचे अण्णासाहेब चितेकर,ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबुराव पवार,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रिंकल तायर,काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढाक्का,शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,सामाजिक कार्यकर्ते संजय देठे,युवा सेना जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे,आदींनी पाठिंबा दिला.
जालना महानगर पालिकेत विविध मागण्यांसाठी दिव्यांगाचे आंदोलनं.
