जालन्यात मनसेचे आंदोलन सुरू असतानाच कामाला सुरुवात!

मनसेने आंदोलनात मागणी केल्याच्या कामाची दखल घेत तत्काळ महानगर पालिकेच्या वतीने कामाला सुरवात.

News published by .news24tas

जालना:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना शहराच्या वतीने जालना शहरातील मस्तगड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रस्त्याची झालेली दुर्व्यवस्था आणि सुशोभीकरण यासाठी मनसेने पालिकेच्या निषेधार्थ मस्तगड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्षणीय धरणे आंदोलन सुरू केले होते व १४ एप्रिल म्हणजेच बाबासाहेबांचा जयंतीपूर्वी परिसरातील कामे मार्गी लावावे यासाठी आंदोलन केले व पालिकेने देखील तत्काळ या आंदोलनाची दखल घेत कामास सुरुवात देखील केली.

आंदोलन सुरू होताच अवघ्या १ तासात कामाला सुरवात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष रवीभैया राऊत यांच्या आदेशाने व शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वात सदरील आंदोलन सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरू केले व आंदोलनाची माहिती पालिका कर्मचाऱ्यांना मिळताच तत्काळ पालिका कर्मचारी आंदोलन स्थानी दाखल झाले व आंदोलनाला अवघा १ तास होताच पालिकेच्या वतीने कामाची सुवात करण्यात आली त्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली व केलेल्या सर्व मागण्या १४ तारखे पर्यंत पूर्ण न झाल्यास थेट १४ तारखेला पालिकेत धडक देण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलना वेळी मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत, शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे, जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे, विलास तिकांडे, वैभव साळे,महेश नागवे, बाळासाहेब काळे,सोमनाथ कदम, आर.आर पाटोळे,सोमनाथ कदम,विवेक वैद्य,योगेश कदम व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या