बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच मला मारहाण केली – करुणा मुंढे.
news published by news24tas
मुंबई:- कौटुंबिक हिंसाचारात दोषी आढळल्या नंतर धनंजय मुंढे यांच्या पुर्व पत्नी करुणा शर्मा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंढे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावर देखील काही गंभीर आरोप केले. व मला मिळालेल्या न्यायाने मी समाधानी नाही मी न्यायालयाने दिलेल्या निकाला विरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे असे देखील करुणा शर्मा म्हणाल्या.
करुणा शर्मा यांचे वाल्मिक कराडवर मारहाणीचे गंभीर आरोप.
करुणा शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात मी आतापर्यंत एकटीच लढले. माझ्यासोबत कुणीच नव्हते. धनंजय मुंडे यांनी अनेक काळ माझा मानसिक आणि शारिरिक छळ केला. खोट्या केसेसमध्ये मला धनंजय मुंडे यांनी बीड आणि येरवड्याच्या तुरुंगात ठेवले. आत्ता जेलमध्ये असलेला गुंड वाल्मिक कराडने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मला मारहाण केली. माझ्या गालाला हात लावण्याची त्याने हिम्मत केली. नको नको तिथे स्पर्श केले, असे गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केले.
तसेच वाल्मिक कराडने मला मारहाण केली त्यानंतर मी बीड जिल्हाधिकाऱ्यांना भेटू निवेदन दिले तसेच मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले. डीजींना पण भेटून मी सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. पण माझ्या निवेदनाकडे आणि मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, असेही करुणा शर्मा यांनी सांगितले.
