सत्तास्थापनेसाठी अवघे काही तास उरले असताना महायुतीत शपथविधी अगोदर आता नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे.
Published by www.news24tas.com
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात असतानाच आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य रांगल्याचे पहिला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नाव छापली व एकनाथ शिंदे यांचे नाव या निमंत्रण पत्रिकेतून गायब झाल्याचे दिसले आहे.यावर गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत ज्या नेतृत्वात निवडणूक लढली त्यांचेच नाव विसरलात अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?
उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्हीही सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना नेते उदय सामंत यांनी मांडली. एकनाथ शिंदे यांच्याच हातात आमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, असंही ते म्हणाले.त्या
नंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. असं असलं तरी गृहमंत्री पदावर एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर खाटेवाटपात शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळावं, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे – विनायक राऊत
शिवसेना फोडण्याचं पाप भाजपाने शिंदेंच्या माध्यमातून केली आहे. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राची फसवणूक जशा प्रकारे करण्यात आली आहे ती पुरे झाली. आता महाराष्ट्राचे प्रश्न सोडवा किंवा ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार ते सांगा असंही विनायक राऊत म्हणाले. वारेमाप पैशांचा वापर निवडणुकीत केला गेला. तसंच ईव्हीएमचा घोटाळा १०० टक्के झाला आहे. असंही राऊत म्हणाले.
