संमेलनात राज यांचे आवाहन आमच्यावर केसेस टाकू नका !

तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका’, राज ठाकरेंचे मंत्री उदय सामंतांना आवाहन.

news published by news24tas

मराठी विश्व साहित्य संमेलनात आज (रविवारी) राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे उदय सामंत यांच्या भाषणानंतर बोलताना म्हणाले की, ‘उदयजी आपण मदत करालच. पण आम्ही जे जे करू त्याला देखील आपण पाठींबा द्यावा, अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आत्तापर्यंतच अनुभव सांगितला बाकी काही नाही. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय. आमच्या आमच्या परीने करतोय असे राज ठाकरे म्हणाले.

मराठी माणसाचे अस्तित्व आपण टिकवायला हवे -राज

राज
‘माणसाचे अस्तित्व हे जमीनवर असते. आमचा इतिहास म्हणता पण इतिहास म्हणजे भूगोल. हा प्रदेश, जमीन पायाखालून सरकली तर तुमचे अस्तित्व राहत नाही. मराठी माणसांचे अस्तित्व असायला हवे ते आपण टीकावायला हवे, प्रगतीच्या नावावर जमीनी जात असतील तर तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो डाव असतो. इतिहासामधून बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा. असे राज ठाकरे म्हणाले.

‘370 नंतर आत्ता जम्मू कश्मीरमध्ये जमीन घेता येते. मला त्या राजकारणात पडायचे नाही. पण तुम्ही हिमाचलमध्ये गेला, आसाम, मणिपूरमध्ये गेला तर तुम्हाला तेथे जमिनीचा एक तुकडा विकत घेता येत नाही. मग आपल्याकडेच ही मोकळीक का दिलीये. या आणि आमच्या जमिनी घ्या. मराठी भाषेसोबत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय केले पाहिजे हे सरकराने बघितले पाहिजे.’, असे आवाहन देखील सरकारला राज ठाकरे यांनी केले.

उदय सामंत यांचे राज ठाकरे यांना आश्वासन.

या मराठी विश्व साहित्य संमेलनात मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेसाठी राज ठाकरे ज्या गोष्टी सांगितील त्या गोष्टींना मदत करू, असे आश्वासन दिले.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या