ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही पहिली टाळी कोणी दिली?

News published by News24tas

मुंबई:– गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शिवसैनिकांची व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची मनातील इच्छा म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही बांधवांनी सर्व मतं भेद विसरून मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र यावे व निवडणुका लढवाव्या परंतु प्रत्येक वेळी महानगर पालिका निवडणुका व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा विषय निघतो व पुन्हा बंद होतो परंतु यावेळी मात्र चित्र जरासे वेगळे असल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी खुद्द राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना युतीचे विचारले असता त्यांनी होकार दिला व उद्धव ठाकरेंनी देखील दुसऱ्याच दिवशी यावर प्रतिक्रिया देत मी देखील तयार आहे म्हणले. व आता पुन्हा एकदा उध्दव ठाकरेंच्या सेनेकडून एकत्र येण्याची साद घातल्याचे दिसत आहे.

एकत्र येण्यासाठी काय म्हणली उध्दव ठाकरेंची शिवसेना?

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत X हँडल वरून एक सूचक ट्विट करण्यात आले असून यात एकत्र येण्याची साथ घालत ‘वेळ आलीयं, एकत्र येण्याची,मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे.मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!.’अनेक असे सूचक वक्तव्य पोस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही जण याचा अर्थ दोन्ही भावांनी एकत्र यावे असा लावत आहेत तर तर काही जणांच्या मते सदरील ट्विट ही मराठी माणसाने एकत्र यावे यासाठी केले गेले असावे असे बोलले जात आहे.त्यामुळे सदरील ट्विट नेमके कोणासाठी होते हे उध्दव ठाकरे परदेशातून परत आल्यावरच समजेल हे मात्र निश्चित.

https://x.com/ShivSenaUBT_/status/1915979947321266531?t=Ishn5RxE-ikvfgo4TuRDvQ&s=19

ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच!

नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला धमकी देणारा तो व्यक्ती कोण?

जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात शिवसैनिकांची तुफान गर्दी.

आ.अर्जुन खोतकर शब्द पाळणार ? जालनेकरांना मिळणार मोठे गिफ्ट!

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या