दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न. शिवसेना – मनसे युती होणार?
News published by News24tas
मुंबई:– दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवनाने आज पर्यंत अनेक राजकीय घडामोडी बघितल्या आहेत.ही वास्तू शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीची साक्षीदार असून अनेक घडामोडी येथे घडल्या आहे.कधी काळी याच शिवसेना भवनातून राज ठाकरे व उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार सर्व महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी येथूनच सूत्रे हलवत. तर राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची स्थापना देखील या शिवसेना भवनाने बघितली आहे.आता या सर्वच गोष्टींना बराच काळ व अनेक दशके उलटून गेली आहेत.आज देखील असंख्य कार्यकर्ते व नेत्याच्या मनातील इच्छा एकाच आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे व मनसे – शिवसेना पक्षाची युती व्हावी. यासाठी प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्षाकडून अनेकदा चर्चा होतात पण युती अद्याप देखील कधीच झाली नाही. यावेळी मात्र दोन्ही पक्षप्रमुख युती संदर्भात सूचक भाष्य करत असल्या कारणाने कार्यकर्ते देखील खूपच उत्साही झाले असून थेट शिवसेना भवना बाहेर पोहचले आहेत.
कार्यकर्त्यांचे मनसे – शिवसेना युतीसाठी प्रयत्न.
राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलतांना युती संदर्भात सूचक वक्तव्य केल्यावर त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील होकार भरला त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील युती व्हावी यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक भागात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे एक सोबतचे फोटो असलेले अनेक बॅनर झळकल्याचे पहिला मिळाले परंतु आताच पुन्हा एक नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यकर्ते थेट शिवसेना भवनाबाहेर उभे राहून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर पकडून आव्हान करतांना दिसत आहेत.त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौरा करून जेव्हा मुंबईत येतील तेव्हा नेमके काय घडते हे पाहावे लागेल. मनसे शिवसेना युती होईल की नाही? यावर तुमची काय प्रतिक्रीया आहे ते आम्हाला नक्की कळवा.
मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!
वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!
