माझ्यावरचे आरोप खोटे मी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार -मुंढे.
news published by news24tas
बीड:-मागील अनेक दिवसांपासून आरोपाचे धनी झालेले धनंजय मुंढे यांनी व्यक्त होत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करत संपूर्ण माहिती दिली व आरोप कारणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून लवकरच मी खटला दाखल करणार असल्याचे धनंजय मुंढे यांनी म्हणले आहे.
धनंजय मुंढे अंजली दमानिया विरुद्ध दाखल करणार अब्रु नुकसानीचा खटला.
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे असे धनंजय मुंढे यांनी सोशल मिडियावर व्यक्त होत म्हणले आहे त्यामुळे आता राज्यात दामनिया विरुद्ध मुंढे असा नवीन सामना पुन्हा चालू होतो की काय पहावे लागेल.
