महाराष्ट्रात एक दिवस कोणाचा तरी मोठा मोठा गेम वाजणार – संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई:-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. हा अहवाल धक्कादायक असून अक्षय शिंदेच्या एन्काऊन्टरला पाच पोलिसच जबाबदार आहेत असे या अहवालात म्हणले आहे . यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे असून सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलंय. मुख्यमंत्रिपदापासून पालकमंत्रिपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत आणि एक दिवस कोणाचातरी मोठा गेम वाजणार आहे. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी नेहमीच घेतले जातात. अक्षय शिंदे प्रकरणात ज्यांच्या आदेशावरून पोलिसांनी एन्काउंटर केला त्या पोलिसांचा बळी जाणारच असेही ते म्हणाले.
ज्याचा गेम झाला तो अजय शिंदे नेमके प्रकरण तरी काय ? 
बदलापूरच्या एक नामांकित शाळेतील कर्मचारी होता व त्याने तेथील एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता त्यावरळी सदरील घटनेची माहिती मिळताच मनसे पदाधिकारी व नागरिकांनी संपूर्ण बदलापूर शहर बंद करत आरोपीवर कारवाईची मागणी केली होती व संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा देखील झाली होती व तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला अटक करणाची मागणी होऊ लागली होती त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्हा नोंदविला होता व नंतर काही दिवसांनी आरोपीला स्तलांतरीत करत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असतं पोलिसानी त्याला एंकाऊंटर करून ठार केले.
