BUDGET 2025 | देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय ?
news published by news24tas
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी १ फेब्रुवारी ला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मद्यम वर्गीयांना खुश करत मोदी सरकारने १२ लाखा पर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत मोठे गिफ्ट देशातील मद्यम वर्गीयांना दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यांनंतर समोर आल्या व मोदी सरकारमधील घटक पक्षांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर विरोधकांनी टिका.
देवेंद्र फडणविसांचे पोस्ट करत अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय याबाबत माहिती.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!
– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
– महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी
(टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.)
अर्थसंकल्पानंतर कोण कोणत्या वस्तु होणार स्वस्त ?
चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील.
मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त होतील.
इलेक्ट्रिक कार स्वस्त होईल.
कपड्याच्या वस्तू स्वस्त होतील.
एलईडी टीव्हीही स्वस्त होईल.
कर्करोगावरील तब्बल ३६ औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत.
तर अनेक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवली जाईल
फ्रोझन फिश पेस्टवरील कस्टम ड्युटी १५ वरून ५ विणकरांनी विणलेले कपडे स्वस्त होतील.
सागरी उत्पादनांवरील कस्टम ड्युटी ३० वरून ५ टक्के करण्यात आली.
नाना पटोले यांची अर्थसंकल्पावर सडकून टिका.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करूनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणुकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदलही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया व गोलमाल आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
लाडक्या बहिणीप्रमाणे निवडणुकीपूर्वी केजरीवालांचे मोठे गिफ्ट मिळणार १ लाख
