देशातील यावर्षीचे सर्वात मोठे जागतिक कर्ज म्हणून झाली या कर्जाची नोंद.
News published by News24tas
मुंबई:- भारत हा दिवसेंदिवस विकसित होत असून अनेक उद्योग धंदे देखील भारतात वाढताना दिसत आहे. अनेक मोठ मोठ्या कंपन्या भारतातून आपला व्यवसाय इतर देशात देखील पसरवत आहेत. व याच व्यवसाय वाढीसाठी अनेक उद्योगपती देश विदेशातील बँकांकडून आपले व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेत असतात. व अशाच एका कर्जाची सध्या जोरदार चर्चा चालू असून सदरील कर्ज हे तब्बल २५००० कोटींचे आहे. व ५५ जागतिक बँकांनी एकत्रित येऊन ही कर्ज मंजूर केले आहे.
२५००० कोटींचे कर्ज घेणारा भारतील उद्योजक कोण?
सदरील कर्जाचा आकडा एवढा मोठा आहे की या वर्षातील हे सर्वात मोठे जागतिक कर्ज म्हणून याची नोंद झाली आहे. तसेच तब्बल ५५ बँकांच्या समूहाने एकत्रित येत ही कर्ज मंजूर केले आहे. व सदरील कर्ज घेणारे उद्योगपती हे दुसरे तिसरे कोणी नसून रिलायन्स इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ने ही २५००० कोटींचे कर्ज घेतले असून यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज ची मार्केट मध्ये असलेली विश्वास अर्हता व विस्तारलेला उद्योग दिसून येतो.
शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केलेल्या कदम यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती.
अनेक अडचणींनी जुना जालना परिसरातील नागरिक त्रस्त! घरे सोडून जावे का?म्हणत व्यक्त केला संताप.
