संतोष देशमुख यांच्या खूनामुळे चर्चेत आलेली बीडची गुन्हेगारी पार्श्वभूमी थांबता थांबेना.
News published by News24tas
बीड:- संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडची गुन्हेगारी संपूर्ण महाराष्ट्रात समोर आली व बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे कशा प्रकारे तीन तेरा वाजलेत हे देखील समोर आले परंतु सर्व घटने नंतर देखील बीड जिल्हयातील गुन्हे आणि गुन्ह्याच्या बातम्या काही कमी व्हायचे नाव घेईना.
बीड पोलिसांनी घतले चौघांना ताब्यात.
आष्टी तालुक्यात वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. या हत्येमागचे कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अजय भोसले (30 वर्षे) आणि भरत भोसले (32 वर्षे) अशी या मृत व्यक्तींची नावं आहेत. हे दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील हातवळण या गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी मृत भावांची नावं आहेत, तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. गुरूवारी हे तिघे भाऊ वाहिरा येथे आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले होते. दुपारपासून हे सगळे त्याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीन्ही भावांवर लोंखडी रॉड अन् धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झालाय. नेमका कोणत्या कारणामुळे हा हे अजून स्पष्ट झालेले नाही.
