अर्जुन खोतकर व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारे आणखी दोघे जण अटकेत.
News published by News24tas
जालना:– जालना मतदार संघाचे आमदार अर्जुन खोतकर यांना व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी २ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर देण्यात आली होती त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करत आरोपीला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करत जालना पोलिस निरीक्षक कार्यालयात घेराव घातला होता. आणि पोलिसांनी देखील गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींना धमकी देणाऱ्या एकाला जालना येथून ताब्यात घेतले परंतु तो सदरील तरुण हा अल्पवयीन निघाला असून त्याने लाईक व फॉलोवर्स वाढावे या साठी सदरील धमकी देण्याचा प्रकार केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला सूचना देऊन सोडले. परंतु आज मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
एकाला नांदेड तर दुसऱ्याला पुण्याहून अटक.
आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील एका आरोपीला पुण्यातील खराडी परिसरातून तर दुसऱ्याला नांदेड येथून अटक केली आहे. नांदेड येथून अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सतीश शिंदे असून पुण्यातील आरोपीचे नाव अंतरेश्वर असे आहे.सदरील आरोपींनी धमकी का दिली? व कोणाच्या सांगण्यावून दिली का? सदरील प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का याचा तपास आता पोलिस करत आहेत.
नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.
वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!
ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?
