नदी प्रदूषण मुक्ती साठी मनसेचे अनोखे आंदोलन .
News published by News24tas
नाशिक:- राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात कुंभ मेळाव्यावरून केलेल्या भाष्या नंतर राज ठाकरेंवर अनेकांनी या वक्तव्यामुळे टीका देखील केली परंतु त्यांच्या त्याच विधानामुळे देशभरातील प्रदूषित नद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. व अनेक दशकांपासून इतके कोटी रुपये खर्च होऊन देखील देशातील व महाराष्ट्रातील नद्या अद्याप देखील प्रदूषित व अस्वच्छ का? असे प्रश्न मनसे पदाधिकारी व सामान्य नागरिक विचारू लागले होते. आता त्याच मुद्यावरून मनसेच्या नाशिक येथील पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत गोदावरी नदी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
कार्यकर्त्यांनी घेतल्या थेट नदी पात्रात उड्या!
मनसेचे नेते दिनकर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वात नाशिक येथे झालेल्या आंदोलनात गोदावरी प्रदूषणावरून नाशिक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले झाले होते व त्यांनी थेट रामकुंडात उड्या घेत आंदोलन केले. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व नद्या स्वच्छ कराव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून जो पर्यंत नद्या स्वच्छ होत नाहीत तो पर्यंत आंदोलने चालूच राहतील असे देखील मनसे नेते दिनकर पाटील म्हणाले.
बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.
