संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बघून नागरे पाटील यांची प्रतिक्रिया.
News published by News24tas
देशात व महाराष्ट्रात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त विक्की कौशल च्या छावा या चित्रपटाची छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असून संभाजी महाराजांच्या पराक्रमाची भुरळ सगळ्याच प्रेक्षकांना पडली आहे. इतिहासात कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता,अचूक असे संवाद व संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला विक्की कौशल सगळ्यांनाच भुरळ घालत असून यात IPS विश्वास नागरे पाटील यांना देखील हा चित्रपट पाहून भुरळ पडली आहे व त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटातील काही संवाद लिहित चित्रपटाचे व महाराजांच्या पराक्रमाचे कौतुक केली आहे.
काय म्हणाले छावा चित्रपटाबद्दल नागरे पाटील.
छावा……… ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते ! ‘मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर हैं धिक्कार !’ केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द ! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात. ‘हाथी घोडे, तोफ तलवारे पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा फौज तो ‘तेरी सारी हैं अब भी सब पे भारी हैं ! छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला ! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून ? आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म ! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा ! राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा ! जगदंब जगदंब ! या शब्दात विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केला आहेत.
