पंतप्रधान पदासाठी फडणविसांचे नाव चर्चेत.

महाराष्ट्राच्या विधानभवनात देशाचा भावी पंतप्रधान निवडला गेला एक दिवस असा येईल ज्या दिवशी देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान बनतील.

Published by https://news24tas.com

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस होतील का?अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. नेतृत्वाची जी फळी तयार होते त्यात फडणवीस यांचे नाव अग्रेसर आहे त्यात महाराष्ट्रासारख्या आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या राज्याचं तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आल्याचे बोलले जाते.

राज्यातले भाजप नेतृत्वसुद्धा या दृष्टीने बघत असल्याचे चर्चा आहे कारण महाराष्ट्रासारख्या राज्यात फडणवीस यांनी सलग तीन टर्म भाजपला १०० पेक्षा जास्त जागा जिंकुन दिल्यात फडणवीसांनकडे उत्तम संघटन कौशल्य आहे त्याचा फायदा त्यांना पक्ष संघटनेवर होईल 2014 ते 2019 या पाच वर्षात सरकार चालवल्यामुळे त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव सुद्धा आहे. त्यांच्या याच बाबी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

इथं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचे देता येईल. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे उत्तम प्रशासक म्हणून असलेली ओळख आणि पक्ष संघटनेवर असणारी पकड त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फायद्याचे ठरले.  90 साला नंतरचे फडणवीस महाराष्ट्रातले असे एकमेव नेते आहेत ज्यांनी त्यांच्या पक्षाला सलग तीन टर्म शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्या.

दुसरी गोष्ट म्हणजे भाजप पक्ष महाराष्ट्रात शिवसेनेच्या बळावर वाढला गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर भारतातल्या राज्यांसारखं महाराष्ट्र हे भाजपसाठी अनुकूल भूमी असलेल्या राज्यां पैकी नव्हते. शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे मजबूत प्रादेशिक पक्ष होते व काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष सुद्धा महाराष्ट्रात प्रबळ होता.त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पुढची आव्हान सुद्धा मोठी होती या सगळ्यावर मात करत फडणवीस यांनी 2014,2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपला शंभर पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ते असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पण अशी कुठली कारणे आहेत ज्यामुळे फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणता येते.

पहिले कारण म्हणजे फडणवीस महाराष्ट्र सारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. देशाचे आर्थिक सत्ता केंद्र असणारे मुंबई शहर महाराष्ट्रात आहे लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचा देशात दुसरा नंबर आहे राज्यात 48 लोकसभेच्या जागा आहेत त्या उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त आहेत थोडक्यात सांगायचं तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र दिल्लीतल्या सत्तेसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा भाजपच्या पारड्यात फक्त नऊ जागाच टाकल्या त्यामुळे भाजप केंद्रात बहुमतापासून दूर राहिला. विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात 288 जागा आहेत या राज्यसभा खासदार निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आता अशा राजकीय सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यामुळे  वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची यादी पाहिल्यास फडणवीस यांनी मोठी मजल मारल्याचा दिसून येईल. थोडक्यात दिल्लीत महाराष्ट्रासारख्या राज्याचं तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे फडणवीसांच वाढलेला वजन त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेऊन बसवते.

फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे फडणवीसांचे उत्तम प्रशासक आणि विकास पुरुष म्हणून असलेली ओळख 2014 ते 2019 च्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या पाच वर्षात फाडणविसांनी आपली इमेज उत्तम प्रशासक असी केली होती या सोबतच शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन सरकार चालवलं ज्यामुळे देशात फडणवीस चर्चेत आलेत.या सोबतच मॅग्नेटिक महाराष्ट्रा या सारखे विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करून घेणारे कार्यक्रम घेऊन फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. 2018 ला फडणवीस मुख्यमंत्री असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उद्योग केंद्र कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमात तब्बल 140 बिलियन डॉलर्स गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचं सांगण्यात येतं त्यातले तब्बल 4.2 मिलियन गुंतवणूक एकट्या एनर्जी सेक्टरमध्ये झाली. या  कार्यक्रमाचं देशभरात कौतुक झालं होते.

लोकांमध्ये कामाचा माणूस म्हणून फडणवीस यांची इमेज तयार झाली आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी अशीच कामगिरी केली तर उद्योग जगतात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार होऊ शकतो. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील असेच उद्योग कार्यक्रम घेतले होते. त्यामुळे गुजरातच्या उद्योग जगताच्या लॉबीमध्ये त्यांचा प्रभाव हळूहळू वाढत गेला याचा फायदा त्यांना पंतप्रधान पदाच्या दावेदारीमध्ये झाल्याचं बोललं जात. मुंबईसारख्या आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आगामी काळात विकास पुरुष म्हणून आपले प्रतिमा निर्माण करू शकतात. त्याचा फायदा त्यांना भविष्यातल्या राजकारणात होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. त्यामुळे उत्तम प्रशासक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. नरेंद्र मोदी देखील गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी क्लीन चीफ मिनिस्टर म्हणुन आपली प्रतिमा निर्माण केली होती. त्याचा फायदा त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झाला.याच स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून फडणवीस यांना फायदा होऊन त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेऊन बसवतो.

फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत असं म्हणण्याचा तिसरा कारण म्हणजे संघाचा फडणवीसंना असलेला पाठिंबा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत यासाठी संघानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जीवाचं रान केल्याचं बोललं जातं त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत फडणवीस असल्यास संघ विना तक्रार फडणवीसांना पाठिंबा देऊ शकतो .भाजपा मध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्यासाठी संघाचा पाठिंबा फार आवश्यक ठरतो 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी संघाने असाच पाठिंबा लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐवजी नरेंद्र मोदींना दिला. त्यामुळे मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले. फडणवीस संघाचे मुख्यालय असणाऱ्या नागपूरमधून येतात त्यामुळे संघाचा पाठिंबा फडणवीसंना मिळू शकतो .दुसरीकडे संघाचे यांच्याबरोबर असलेले  संबंध चांगले असले तरी योगी आणि फडणवीस यांपैकी एकाची निवड करायची झाली तर संघ फडणवीसांना प्राधान्य देऊ शकतो.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी आपली प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी तयार केली यामुळे हिंदुत्ववादी प्रतिमेच्या जोरावर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहेत असं म्हणावं लागतं.

देवेंद्र फणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जरी असले तरी त्यांच्या समोर अनेक आव्हाने देखील आहेत.

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रातल्या एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते त्यावेळी त्याचे पंख दिल्लीतून छाटले जातात.यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे या गोष्टीचे उत्तम उदाहरण.

2014 ते 2019 असे पाच वर्ष महाराष्ट्राचा कारभार उत्तमपणे सांभाळल्यानंतर फडणवीसांच नाव त्याचवेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले होतो पण 2022 ला सेनेत बंड झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद बळजबरीने स्वीकारला लावल्याच्या चर्चा झाल्या. त्यामुळे फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असले तरी त्यांना आगामी काळात केंद्रीय भाजपशी दोन हात करावे लागणार का हे पाहावे लागेल.कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नरेंद्र मोदी नंतर देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत योगी आदित्यनाथ आहेत की नाहीत हे 2027 ला होणारी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक देखील ठरवू शकते. योगी आदित्यनाथ जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर फडणवीस यांना योगी हे मोठे आव्हान असेल कारण आदित्यनाथ कट्टर हिंदुत्ववादी व उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य राज्याचे ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मोठे आव्हान निर्माण करू शकतात. फडणवीस यांच्या समोर आव्हानांचा डोंगर मोठा आहे याआव्हानांचा फडणवीस कसा सामना करतील यावर त्यांच्या पंतप्रधान पदाचे गणित अवलंबून असेल.

तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत का आणि प्रतिक्रिया व महाराष्ट्राचे पहिले पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतीच का तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. news24tas

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या