राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यावर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया.
News published by News24tas
मुंबई:- भैयाजी जोशींच्या वक्तव्यामुळे चालू झालेल्या वादावर सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या वर टिका केली व त्याच टीकेला प्रतिउत्तर देत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना चांगलेच सुनावले व थेट इशाराच दिलाय.एक दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी मुंबईत विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे त्यामुळे प्रत्येकाने मराठी शिकलेच पाहिजे असे नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर लगेचच राज ठाकरे यांनी निषेध नोंदवत एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित करत म्हणले होते की ,राजकारण करत असताना आपण स्वतः मराठी आहोत हे भैयाजी जोशींनी विसरू नये. या सदरील पोस्ट नंतर लगेचच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या वर टिका केली व सदावर्ते म्हणाले की, स्वतःचे लेकरं कॉन्वेंटमध्ये शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका. राज ठाकरे मला सांगा, तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या ? सदावर्तेच्या या विधानाचा चांगलाच समाचार मनसे ने घेतला असून खोचक शब्दात त्यांच्यावर टिका केली आहे.
सदावर्ते पग सारखा दिसतो! नेमके काय म्हणाले अविनाश जाधव?
एक वृत्तवाहिशी बोलतांना मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली असून जाधव म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते हा फालतू माणूस असून हा माणूस महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विरोधात आहे. त्याचबरोबर सिद्धिविनाय मंदिरात काय कपडे घालावे त्या निर्णयाच्या विरोधात आहे. त्याच्यात जर हिंमत आहेच न त्याने तिरुपती ला जाऊन तिथल्या ड्रेसकोड वर बोलावे. खरं तर हा माणूस आमच्या औलादी काढतो पण याची औलाद कोणत्या भाषेत बोलते ते कळत नाही. अर्धी हिंदी, अर्धी इंग्लिश,अर्धी मराठी अशी ती बोलते. सदावर्ते यांनी त्यांच्या औलादीला योग्य शाळेत शिकवले असते तर महाराष्ट्रा समोर एक चांगले उदाहरण गेले असते.सदावर्ते हा पग आहे तो सेम त्या पग सारखा दिसतो अशा शब्दात खोचक टीका करत जाधव यांनी अक्षरशः सदावर्ते यांना धुणच काढले. त्यामुळे आता यावर सदावर्ते काय बोलतात बघावे लागले.
https://news24tas.com/मराठी-जनता-दुधखुळी-नाही-भ/
https://news24tas.com/मेलेला-मराठा-विरुद्ध-म/
