फडणवीसांच्या शपथविधीला उध्दव ठाकरेंना निमंत्रण

 

महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर महायुतीकडून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

मुंबई:– महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजप व महायुती कडून करण्यात येत आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीला उध्दव ठाकरेसह देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्री व मुख्य नेत्यांना आमंत्रण महायुती कडून देण्यात आले आहे. या सोहळ्याला अनेक संत महांतना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

शपथविधी

त्याचबरोबर १० लाख कार्यकर्ते ‘एक है तो सेफ है’ अशा आशयाचे मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत. ज्या नाऱ्यामुळे महायुतीला विधानसभेत दणदणीत विजय मिळाला त्या नाऱ्याचा जोरदार प्रचार भाजप व महायुतीकडून शपथविधी सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे दिसून येते.

शपथविधी सोहळ्याला कोण कोणते मुख्यमंत्री उपस्थीत राहणार?

योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

चंद्राबाबू नायडू – मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश

नितीन कुमार – मुख्यमंत्री, बिहार

प्रेमा खांडू – मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश

हिमंत बिश्व शर्मा – मुख्यमंत्री, आसाम

विष्णूदेव साय – मुख्यमंत्री, छत्तीसगढ

प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा

भूपेंद्र पटेल – मुख्यमंत्री, गुजरात

नायब सिंह सैनी – मुख्यमंत्री, हरियाणा

मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

कॉनराड संगमा – मुख्यमंत्री, मेघालय

भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान

मानिक साहा – मुख्यमंत्री, त्रिपुरा

पुष्कर सिंह धामी – मुख्यमंत्री, उत्तराखंड

कोण कोणते संत महंत उपस्थीत राहणार?

नरेंद्र महाराज नानीदना

मदेव शास्त्री, भगवानगड

राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन

गौरांगदास महाराज, इस्कॉन

जनार्दन हरीजी महाराज

प्रसाद महाराज अंमळनेरकर

महानुभाव संप्रदायाचे विध्वंस बाबा आणि मोहन महाराज

जैन मुनी लोकेश

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या