कॉपी करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे मंडळाचे आदेश मनसे आक्रमक.
News published by news24tas
यवतमाळ:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असून परीक्षेत होणारा गैरप्रकार थांबावा म्हणून थेट विद्यार्थ्यांवर फौजदारी करवाई करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने दिले असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला तीव्र विरोध केला आहे.
फौजदारी कारवाईचा आदेश तात्काळ रद्द करावा – मनविसे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी काढलेल्या या आदेशाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कडाडून विरोध केलेला असून लवकर हा आदेश मागे घ्यावा असे म्हणले आहे. कॉपी करणाऱ्यांचे समर्थन नाही परंतु, या वयात कोणाकडुन कळत नकळत चुक घडल्यास त्याचे वर फौजदारी कारवाई करुन त्याचे आयुष्य बदबाद करण्याचे काम जे आपल्या शासनातर्फे हाती घेतलेले आहे, त्याला आमचा तिव्र विरोध आहे. आज या वयातील मुले – मुली हे भारताचे भविष्य मानले जातात आणि त्यांच्यावर या वयात कळत नकळत झालेल्या चुकीमुळे कारवाई झाल्यास त्यांच्या भविष्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होईल. चुकीच्या गोष्टीला शिक्षा मिळणे गरजेचे असते. परंतु, ती चुक सुधारण्याची संधी न देता अशा प्रकारे भवितव्य अंधारात घालण्याचा आदेश हा निश्चितच अन्याय कारक आहे असे मनसे कडून निवेदनात म्हणण्यात आले असून यावर काय कारवाई होते,शैक्षणिक मंडळ आपला निर्णय मागे घेते की नाही पाहावे लागेल.
जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वात डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री दादा दगडूजी भुसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष श्री. अमित बदनोरे, प्रथमेश पाटील, तुषार काटपेलवार, साईराम कवडे, साहिल जतकर, अभिषेक तरेकर, भरत राठोड, रोशन गवई, वासुदेवराव विधाते, व विजय राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
