लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार?
News published by News24tas
विधानसभा निवडणुकीचा अगोदर चालू झालेली लाडकी बहिण योजना युती सरकारच्या विजयासाठी सिंव्हाचा वाटा उचलणार ठरली परंतु निवडणुकी नंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही मिळणार तर कधी असा सवाल अनेक बहिणींना पडलेला होता पण आता लवकरच लाभार्थी बहिणींना सरकारकडून योजनेची रक्कम खात्यात मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.अश्या प्रकारची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे आता लवकरच बहिणींना आपले पैसे मिळतील हे मात्र नक्की.
काय म्हणाल्या आदिती तटकरे बहिणींचे पैसे कधी मिळणार ?
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
काँग्रेस ने बाबासाहेबांना कधी भारतरत्न दिले नाही.
