घोटाळ्या संदर्भाद वारंवार पाठपुरवठा केल्याने मिळाले यश.
News published by News24tas
मुंबई:-महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर आणि उपनगरातील मेजर नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी तसंच मिठी नदी मधील गाळ उपसा करण्यासाठी ज्या निविदा काढल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणे झालेला घोटाळा हा बाळा नांदगावर यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला असून यामुळे मुंबईकरांचे तब्बल १२५ कोटी रुपये वाचले आहेत.
‘Bid Rigging’ ‘Tender Fixing’ संदर्भात बाळा नांदगावकर गुरुवार दिनांक २० मार्च रोजी पुन्हा मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजीत बांगर यांची भेट घेतली होतो. व त्यापूर्वी १० मार्च २०२५ रोजी याच संदर्भात श्री बांगर साहेब आणि माननीय मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन या महाघोटाळ्यासंदर्भात सविस्तर पत्रदेखील दिलं होतं.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत बाळा नांदगावकर काय म्हणाले ?
बाळा नांदगावकर यांनी दिलेल्या त्या पत्राची दखल घेऊन, सदर निविदा पुन्हा काढण्यात आल्या आणि जे काम १० टक्के Above Rate ने दिलं होतं तेच काम आता १६ टक्के Below Rate ने दिल्यामुळे निविदा २६ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे किमान १२५ कोटी रुपये वाचले आहेत.
या महाघोटाळ्यासंदर्भात जो पाठपुरावा सातत्याने करत आहे त्याचंच हे यश आहे. असे बाळा नांदगावकर म्हणाले. त्याचबरोबर य मी आज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे पत्राद्वारे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजित बांगर यांना दिले आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबई महानगरपालिकेचे किमान १०० ते १५० कोटी रुपये वाचतील.
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतील लूट वाचणार असून पर्यायाने करदात्या मुंबईकरांना त्याच्या निश्चित फायदा होणार आहे.
तसंच डिसल्टींग शील्ड पूल मशीन चा घोटाळा आणि घाटकोपर येथील नालेसफाई कार्यालयामधून सन २१-२२ आणि २२-२३ साली १० कोटी रुपयांचे Purchase Order आणि Purchase Certificate चा जो महाघोटाळा केलाय त्याबद्दलही सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. असे बाळा नांदगावकर म्हणाले.
