बीड | संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेची हत्या.
news published by news24tas
बीड:-संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. 2023 मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, तरीही त्याला अटक झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, मागील चार वर्षांत त्याच्यावर धारूर, आंबेजोगाई आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. एवढे गुन्हे करूनही तो मोकाट कसा फिरत होता? त्याला कोणी पाठीशी घालत होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर
“बीडमधील अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. लोक स्वतःहून पुढे येऊन अन्यायाविरोधात बोलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल असा मला संशय आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही,” असे संदीप क्षीरसागर म्हणाले. त्यांनी कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा संशय व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. “एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, आणि मला वाटत नाही की हा माणूस सापडेल,” असेही ते म्हणाले. प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, “पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवले तर तो २४ तासांत सापडतो. त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा.” क्षीरसागर यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.
– click here to join.
