भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.

भटक्या श्वानावार कार्यवाही कधी शहरातील तब्बल १००० पेक्षा जास्त नागरिकांना चावा .

news published by news24tas 

जालना:- जालना शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानाची संख्या वाढली असून महानगरपालिका यावर कार्यवाही कधी करणार असा संतप्त सवाल जालना शहरातील नागरिक विचारात असून भटक्या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी रात्री व सकाळच्या वेळेस कुत्र्यांच्या टोळ्या चौक चौकात वावर करता असून दिसेल त्याला अचानकपणे चावा घेत आहेत. मंमादेवी नगर, कांचन नगर, सत्कार कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली या परिसरात मोठया प्रमाणात चिकन- मटन चे दुकाने असून येथून निघणारा जनावरांचा टाकाऊ भाग तेथील काही व्यापारी सदरील परिसरातच टाकत असल्या कारणाने देखील परिसरात कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.पालिका प्रशासन ना सदरील व्यापऱ्यांवर कार्यवाही करते ना त्यांना घाण व कचरा टाकण्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देते.तसेच नवीन जालना, स्टेशन रोड, गांधी चमन भागात देखील अशीच काहीशी परिस्थिति असून प्रशासन योग्य उपाययोजना कधी करणार असा सवाल नागरिक करत आहेत .

शहरातील कुत्रे

 १००० पेक्षा अधिक नागरिकांचा चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला.

शहरातील जिल्हा रुग्णालयात १००० पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहीती असून हा आकडा वाढू नये यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात व मुक्या जनावरासाठी देखील प्राणी मित्रांना सोबत घेत इतरत्र राहण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी यामुळे नगरिकांना त्यांचा जीव धोक्यात घालून शहरात फिरावे लागणार नाही.

मनसे देखील कुत्र्यांच्या मुद्यावर आक्रमक .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखेवैभव साळे यांनी देखील वारंवार कुत्र्याच्या मुद्यावरून प्रशासनाला निवेदान दिले असून अनेक नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या कडे प्राप्त झाल्या तसेच  दि.२३/०१/२०२५ ला शिवसेनेचे शहर संघटक योगेश रत्नपारखे यांना देखील कुत्र्याने चावा घेतल्या नंतर मनसे  आक्रमक झाल्याचे पहिलं मिळाले व त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व तत्काळ उपाययोजना कराव्या असे देखील म्हणले.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या