अपयश बाजूला सारून मनसे पुन्हा जनतेसाठी मैदानात
भांडुप:-अवघे 23335 मतदान घेत 54419 मतांनी मनसे उमेदवार शिरीष गुणवंत सावंत यांचा दारूण प्रभाव झाला विशेष म्हणजे एकेकाळी भांडुप हा मनसे चा बालेकिल्ला मानला जात होता 2009 ला मनसे चे शिशिर शिंदे मनसेच्या इंजिनातून थेट विधानसभेत पोहचले होते व राज ठाकरेंचे ते निकटवर्तीय देखील मानले जात होते परंतू नंतरच्या काळात मनसे ला मिळालेला अपयशात त्यांनी देखील मनसेला सोड चिठ्ठी देत शिवबंधन बांधले व येणं निवडणुकीच्या काळात मनसेचे संदीप जळगावकर यांनी देखील 2024 ला मनसेला सोडचिठ्ठी दिली.
तरी देखील निवडणुकी पूर्वी भांडुप हा मनसेचा अभेद गड समजला जायचा कारण एवढे नेते मंडळींनी सोडचिठ्ठी देऊनही मनसे सैनिक मात्र राज ठाकरे यांच्या सोबतच होते व सोबत आहेत याचाच प्रत्यय आज देखील आला निवडणुकीत मिळालेले अपयश बाजूला सारून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरताना दिसू लागली आहे.
निवडणुकीत जनतेने जरी मनसे ला नाकारले असले तरी सर्व अपयश पचवून मनसे पदाधिकारी पुन्हा एकदा कामाला लागलेले दिसत आहेत .आत्ताच भांडुप सारख्या शहरात मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून त्या घटनेविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिस स्टेशनला धाव घेत सदरील घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली व निवेदन देत अशा घटना होऊ नये या साठी प्रशासनाने पावले उचलावी अशी विनंती केली.
भांडुप विभागातील नामांकित शाळेत तीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, अशा घटना होऊ नये याकरिता यापूर्वीही “महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. अमित साहेब ठाकरे” यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना निवेदन देण्यात आले होते की शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी (पोलीस व्हेरिफिकेशन) करण्यात यावे परंतु एवढं करूनही प्रशासनातर्फे, सरकारतर्फे कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत असे दिसते.
वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेता सरकारने व प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, भांडुप विधानसभा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढं मात्र नक्की,व हीच गोष्ट प्रशासनाला कळविण्याकरिता विद्यार्थी सेनेतर्फे भांडुप पोलिस ठाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विभाग सचिव नितीन साळकर , कामगार सेना चिटणीस सर्वेश सावंत, उपविभाग अध्यक्ष जगन्नाथ गोसावी, विद्यार्थी संघटक कामेश फुमातीया, सिमरन गमरे, तसेच महाराष्ट्र सैनिक अभिजीत बुरमेकर, किरण भोसले, प्रथमेश कदम हे देखील उपस्थित होते.#Raj thackery
