भाजपच्या कांबोजांची गजाभाऊला धमकी उचलणार म्हणजे उचलणारच

Published by news24tas

जाभाऊ कुठे ही असो उचलणार म्हणजे उचलणार – कंबोज .

News 24tas:- महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस व चद्रशेखर बावनकुळे यांना उचलताना एक फोटो तुफान व्हायरल झाला होता त्या फोटोत जी व्यक्ती होते ते मोहित कंबोज भाजपचे कार्यकर्ते नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने व सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट ने नेहमीच चर्चेत असतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (एक्स) वरती त्यांनी ट्विट करत गजाभाऊ नावाच्या अकाउंट ला टॅग केले आणि My next target @gajabhauX धरती पे किधर भी होगे, उठा के लाए गे ! हर हर महादेव असे ट्विट केले.

 गजाभाऊ नेमका आहे तरी कोण?

विधानसभा निवडणुकी दरम्यान ‘X’ (एक्स)या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती गाजाभाऊ या नावने असलेल्या अकाउंट वरुन महायुतीवर व महायुतीच्या नेत्यांवर अनेक प्रकारच्या टिका करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या सदरील व्यक्ती अमेरिकेत बसून महायुती,भाजपवर व नेत्यांवर वैयक्तिक टिका करत असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. जगात कुठे ही असला तरी त्याला उचलून आणणारच असा इशाराच कंबोज यांनी दिला.

काय म्हणले गजाभाऊ?

यावरती गजभाऊ यांची देखील प्रतिक्रीया आली असून मी मोहित कंबोज यांच्या धमकीला इतकेच उत्तर देईल की मी शिवाजी महाराजांचा मावळल आहे दत्ताजी शिंदेंनी तेव्हा जे उत्तर दिले तेच मी देईल की ‘बाचेंगे तो और भी लाढेंगे’ माझी पूर्ण गोष्टीची तयारी आहे फक्त येताना तुझ्या बापाला घेऊन ये तुला जशास तसे उत्तर मिळेल असे उत्तर गाजाभाऊ यांनी दिले.

प्रकरणावर शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

यावर संजय राऊत बोलताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या अवती-भोवती असलेले परप्रांतीय लोक मराठी माणसाला धमकी देतायत उचलून आणण्याची भाषा करत आहेत आणि मराठी माणसासाठी लढणारी शिंदेंची शिवसेना त्याच पक्षासोबत सत्तेत आहे ही फार गंभीर बाब आहे.तुम्ही आमचा पराभव जरी केला असला तरी तुम्ही मराठी माणसाचे लढण्याचे बळ तुम्ही नष्ट करू शकत नाहीत .

विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे देखील गजाभाऊसाठी मैदानात.

शिवसेना नेते व विरोधी पक्ष नेते गजाभाऊसाठी मैदानात उतरल्याचे पहिला मिळाले मोहित कंबोज यांच्याच ट्विट ल रिट्विट करत दानवे म्हणले कीया असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट अशा शब्दात गाजाभाऊ ची पाठराखण दानवे यांनी केली.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या