राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा.
News published by News24tas
मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक विषयांना हात घालत भाष्य केले आहे व राज्य सरकारला देखील काही महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. यावेळी राज ठाकरेंनी भाषणात बोलताना औरंगजेबाच्या कबरीवरून जे काही राज्यात चालू आहे त्यावर देखील भाष्य केले व आपला विचार मांडत राज ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीच्या आजू बाजूचे सुशोभीकरण काढून टाका. ती कबर तशीच राहू द्या व तेथे बोर्ड लावा की ‘ आम्हा मराठ्यांना मारायला आलेला औरंगजेब येथेच गाडला गेला. अशी मागणी राज ठाकरेंना आपल्या भाषणातून केली. आता त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते हालचाली करत असून बोर्ड लावण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
बोर्ड लावण्यासाठी मनसे नेत्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे नेते एक्टिव झाले असून सदरील प्रकारचा बोर्ड लावण्यात यावा व तेथील सजावट काढून तेथे सी.सी.टीव्ही लावण्यात यावे व जो कोणी तेथे फुल चादर चढवायला जाईल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मनसे नेते नयन कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
राज ठाकरेंची सभा आणि बोर्डाच्या मुद्ऍद्यावरून कार्यकर्ते ऍक्टिव्ह.
राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा झाली आणि अनेक ठिकाणी मनसे नेते व कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळाले आहे.राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बँकांना भेट देऊन बोर्ड मराठीत करा ही मागणी केली तर मनसे नेते नयन कदम यांनी औरंगजेबाच्या कबरी वर बोर्ड लावावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
जिंदगीया उजड जाती घर बनाने मैं ! तुम्हे शर्म नहीं आती तोडणे मैं!-जलील!
