मनसेचा मुलुंडमध्ये राडा! अंगावर फेकला कोळसा.

शिक्षिकेला शाळेतील शिक्षकाने छेडछाड केल्याचा आरोप मनसे आक्रमक.

News published by news24tas

मुलुंड:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड येथील एका इग्रजी शाळेत प्रचंड राडा घातला असून शाळेत तणावाची परस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.सदरील शाळेतील शिक्षिकेने मनसे पदाधिकाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतल्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळते असून त्यांनी थेट तेथील शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकला असून त्याच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.सदरील घटनेमुळे शाळेत तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व सदरील शिक्षकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रात्री अपरात्री कॉल करून छेडछाड केल्याचा आरोप ! मनसेने अंगावर फेकला कोळसा.

सदरील शिक्षकावर शाळेतीलच शिक्षिकेने रात्री अपरात्री कॉल करून छेडछाड केल्याचा आरोप केला असून शाळेतील मुलींचे देखील फोन नंबर मागितल्या आरोप आहे. त्यामुळे घटनेची तक्रार मनसे कडे मिळतच मनसे पदाधिकारी आक्रमक झाले व त्या शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकत निलंबनाची मागणी शाळा प्रशासनाकडे मनविसेने केली आहे.

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या