मनसे वर्सोवा उमेदवार संदेश देसाई यांचा evm मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप .
Published by news24tas
वर्सोवा:- वर्सोवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा उमेदवार संदेश देसाई यांनी ईव्हीएम मशीन मध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय व्यक्त करत 2019 व 2024 ला मला एकसारखीच मते कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित केला.
विधानसभा निकालानंतर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या प्रभावाचे कारण ईव्हीएम असल्याचे सांगितले व अनेकांनी पुरावे सादर करत व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी अर्ज देखील केला . त्यातच मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी देखील काही प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम विरोधात बॅनरबाजी देखील केली ‘ईव्हीएम बेवफा है’ अशा आशयाचे बॅनर वर्सोव्यात लावत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हणले.
नेमके काय म्हणाले मनसे उमेदवार देसाई.
आम्ही प्रचार करत असताना अनेक ठिकाणी आम्हाला भरपूर प्रतिसाद देखील मिळत होता लोक आम्हाला स्वतः येऊन सांगत होते की आम्ही इतर उमेदवाराला कंटाळलो आहोत आम्ही एक तरुण उमेदवार म्हणून तुम्हाला निवडून देऊत. आम्ही देखील मतदानाच्या दिवशी अनेक सुमारे ८ ते १० हजार मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्याची व्यवस्था करून दिली आम्हाला विजयाची खात्री तर होतीच परंतु २० ते २५ हजार मतांच्याखालीआम्हाला मतदान होणार नाही याची देखील खात्री होती परंतु मला २०१९ देखील ५०३६ मते व २०२४ ला देखील ५०३६ मते मिळाली दोन्ही वेळा एक मत ना कमी ना जास्त कासकाय शक्य असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.
काही दिवसापूर्वी मनसे चे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम वर शंका उपस्थित केली व व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आठ लाख रुपये भरले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. महायुतीने हे यश EVM मशीन सेट करून मिळवल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने EVM वरील याचिका फेटाळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी EVM वर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं , मात्र ते दिसत नाही असं मतदार सांगतात. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याने व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आठ लाख रुपये भरले आहेत,’ असं राजू पाटील म्हणाले.
