मनसैनिकाचा अपघाती मृत्यू, अमित ठाकरेंनाही अश्रू अनावर.

सांत्वनासाठी आलेल्या अमित ठाकरेंना पाहताच आईचा टाहो.

News published by news24tas

हिंगोली:- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पिकअप व कारच्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे हे जागीच ठार झाले होते त्यांच्या सोबतचे आणखी दोघे जण या अपघातात गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहे. सदरील अपघात हा हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील लिंबाळा मक्ता भागात झाला होता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यांनी अजिंक्य घुगे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली असून कुटुंबाला आधार दिला आहे.

अमित ठाकरे यांच्या पक्षातील नेत्याच्या अपघाताचे नेमके कारण काय?

मिळालेला माहितीनुसार, मंगळवार 11 मार्च रोजी नऊ वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी लिंबाळा मक्ता परिसरात अजिंक्य घुगे हे आपल्या कारमधून औंढा नागनाथ येथून हिंगोलीकडे येत होते. दरम्यान गाडी अनियंत्रित झाल्याने त्यांची कार आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घुगे हे जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय या अपघातात वाहनांचे ही मोठे नुकसान झाले असून कारचे इंजिन कारमधून बाहेर पडले असल्याचं दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्याम कुमार डोंगरे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू केली. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले व घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यात नेमकी कुणाची चूक होती हे तपासानंतरच कळू शकणार आहे. 25 वर्षांचा अजिंक्य घुगे हा मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुठे यांचा भाचा होता. तर दिनेश पोले, निखिल पराडकर अशी जखमींची नावे आहेत.

अमित राज ठाकरेंना अश्रू अनावर.

कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अमित राज ठाकरे हे मुंबईवरून विमानाने छत्रपती संभाजी नगरला सकाळी ५ वाजेचा सुमारे पोहचले व समृध्दी महामार्गामार्गे हिंगोलीला १ वाजेच्या आसपास पोहचले असता त्यांनी ज्यावेळी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी अजिंक्य घुगे यांच्या आईंनी अमित ठाकरे यांना पाहताच टाहो फोडला त्यावेळी अमित ठाकरे यांना देखील अश्रू अनावर झाले होते.अमित ठाकरे यांनी देखील स्वतः ला व कुटुंबियांना सावरत कोणतीही मदत लागल्यास मला हक्काने सांगा असे अमित ठाकरे म्हणाले.

दौऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या देखील भेटी गाठी अमित ठाकरेंनी घेतल्या.

कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर लगेचच अमित ठाकरे छत्रपती संभाजी नगरकडे निघाले असता मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची अमित ठाकरे यांनी महामार्गावर १० मिनिटे भेट घेतली व काळजी घ्या व सावकाश जा असा प्रेमळ सल्ला कार्यकर्त्यांना अमित ठाकरे यांनी दिला.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या