जरांगेंच्या मेहुण्यावर अवैध वाळू वाहतूकीमुळे तडीपारीची कारवाई.
News published by news24tas
जालना:- मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या मेहूण्यावर जिल्हा प्रशासनाकडून अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने सदरील तडीपारीची कारवाई करण्यात आली असून अन्य ८ जणांचा यात समावेश आहे.
या आरोपींपैकी सहा आरोपी हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याची माहिती समोर येत असून,या आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, आंतरवाली सराटी येथे आंदोलनात जाळपोळ व सरकारी कामात अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल आहेत.
जरांगे पाटलाच्या मेहुण्या विरोधात कोणते गुन्हे दाखल?
जालना पोलीसांनी ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याच्या समावेश असून त्याच्याविरोधात २०२१ आणि २०२३ मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आसून २०२ ३ मध्ये जालना येथील शाहगड येथे बस जाळल्याप्रकरणी देखील एक गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केशव वायभट, संयोग सोळुंके, गजानन सोळुंके, संदीप लोहकरे, रामदास तौर, अमोल पंडित, गोरख कुरणकर, वामन तौर आणि विलास खेडकर अशी या नऊ जणांची नावे आहेत. या नऊ जणांवर वाळू चोरीसह इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी विलास खेडकर हा मनोज जरांगे यांचा मेहुणा आहे.
