मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या.

मराठा

मराठा आरक्षण मिळत नसल्या कारणामुळे जाधव यांची आत्महत्या.

News published by News24tas

छ.संभाजीनगर :-मराठा आरक्षणामुळे राज्यात वातावरण तापलेले असताना आणखी एका तरुणाने आपले जीवन संपवले. समाजाला समर्पित म्हणत विष प्राशन करून केली त्यांनी आत्महत्या केली.

रवींद्र बाबूराव जाधव राहणार पाल (तालुका फुलंब्री,जि. छत्रपती संभाजी नगर )येथील एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी घरात कोणी नसताना समाजासाठी मनोज जरांगे लढा देत आहेत पण तरी देखील अजून पर्यंत आरक्षण मिळाले नाही माझे जीवन समाजासाठी समर्पित अशा आशयाची चिठ्ठी लिहीत विष प्राशन केले व जिवन संपवले.सदरील घटना जेव्हा जाधव कुटुंब घरी आले तेव्हा उघडकीस आली त्यानंतर जाधव यांना छत्रपती संभाजी नगर येथील घटी येथे घेऊन गेले परंतू तो पर्यंत जाधव हे मृत झाले होते. त्यांच्या मागे आई – वडील,भाऊ,पत्नी असा परिवार आहे.

मराठा आरक्षण

मराठा आरक्षणासाठी आणखी किती बळी?

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आणखी किती आंदोलक व मराठा बांधव त्या साठी आपला जीव गमावणार असा प्रश्न आता उपस्तीत होत आहे.जाधव हे देखिल मराठा आरक्षणासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय होते.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या