ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाधव यांचा घेराव.
news published by news24tas
ठाणे:- सर्व महाराष्ट्रात व देशात मराठी भाषा दिन आज मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा होत असतांना ठाणे महानगरपालिका मराठी भाषा दिनाचा कदाचित विसरच पडला आहे असे पहिला मिळाले. खरं तर या वर्षीचा मराठी भाषा दिवस हा आजपर्यंत झालेल्या मराठी भाषा दिनापेक्षा मोठ्या उत्साहाने साजरा झाला पाहिजे होता कारण मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा याच वर्षी मिळाला आहे परंतु या सर्वच गोष्टींचा विसर ठाणे महानगरपालिका पडला व पालिकेतर्फे एकही कार्यक्रम मराठी भाषा दिनी घेण्यात आला नाही.
अविनाश जाधव थेट ठाणे महानगरपालिकेत !
आज ठाण्यात व महाराष्ट्रभर मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ठाण्यात लाडू वाटप करत ठाणे स्टेशन परिसरात हा दिन मोठ्या उत्साहाने साजर केला परंतु याच दरम्यान ठाणे महानगर पालिका पडलेला विसर लक्षात आणून देण्यासाठी कार्यकर्त्यांसह अविनाश जाधव थेट आयुतांच्या दालनात पोहचले व ‘ जिथे मराठीला स्थान नाही तिथे,आम्हाला तुमचा मान नाही ‘ ‘ गळून पडला खरा मुखवटा समोर आला खरा चेहरा, पालिकेतर्फे एकही कार्यक्रम आयोजित करणार आला नाही’ अशा आशयाचे फलक झळकवत आंदोलन केले.यावेळी घोषणांनी संपूर्ण पालिका परिसर दणाणून गेला होता.
छावा बघून दिल्लीतले तरुण जागी झाले पण महाराष्ट्रातले मावळे का नाही?
https://news24tas.com/छावा-चित्रपट-पाहुन-विश्व/
