Avinash jadhav:- शे – पाचशेत आपली मते विकणाऱ्या मराठी माणसांनो भोगा कर्माची फळे -मनसे
News published by news24tas
कल्याण:- कल्याणच्या एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्ला नावाच्या व्यक्तीने मराठी भाषेविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करत गोंधळ घातला. बाहेरच्या गुंडांना इमारतीमध्ये बोलवून शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप व काठ्यांनी मारहाण केली.
यामध्ये मारहाणीमध्ये अनेक जण जखमी असून एका व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद नागपूरच्या अधिवेशनात उमटले आहेत. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हे प्रकरण मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे. या प्रकरणी मारहाण करणार्या व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा खोटा ‘कार नामा’ सोमोर. (मनसे)
सदरील आरोपी खासगी गाडीवर लाल दिवा लावून IAS असल्याचा खोटा प्रचार करायचा अशी देखील महिती समोर येत आहे.
मनसे देखील आक्रमक
यासर्व प्रकरणावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आक्रमक झाली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याविषयी प्रतिक्रिया देत शे – पाचशेत आपली मते विकणाऱ्यानो भोग आ कर्माची फळे असे म्हणत जरी मराठी माणूस आमच्या सोबत निवडणुकीत उभा राहील नसला तरी मनसे मात्र नेहमीच मराठी माणसासाठी उभी राहणार असे वक्तव्य केले.
